सचिन मोहिते / देवरुख
रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशन व संगमेश्वर तालुका खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने सोनवी घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, सोनवडे संचलित माध्यमिक विद्यालय, सोनवडे व आजी-माजी विद्यार्थी माध्यमिक विद्यालय, सोनवडे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन माध्यमिक विद्यालय, सोनवडे येथे करण्यात आले आहे होते. या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेतील १४ वर्षाखालील गटात संगमेश्वर-अ आणि खुल्या गटात संगमेश्वर-ब संघाने अंतिम विजेतेपद प्राप्त करून संगमेश्वर तालुक्याला निर्विवाद यश प्राप्त करून दिले. या स्पर्धेमध्ये लांजा तालुक्यातील अधिक संघांचा सहभाग लाभला.
स्पर्धेचे उद्घाटन अनंत मांडवकर व दत्ताराम शिंदे यांनी केले. याप्रसंगी संदीप तावडे, डॉ. सदानंद आग्रे, पंकज चवंडे, सचिन लिंगायत, संस्थाध्यक्ष प्रभाकर सनगरे, अनिल नांदळजकर, नवनाथ खामकर, पूजा उबारे, श्रद्धा गुरव, वसंत इंदुलकर, दत्तात्रय खातू, रवींद्र वासुरकर, शंकर धामणे यांच्यासह प्रशालेचे बहुसंख्य आजी-माजी विद्यार्थी आणि खो-खोप्रेमी नागरिक यांची उपस्थिती होती.
१४ वर्षाखालील मुलगे गटात प्रथम क्रमांक संगमेश्वर-अ,
द्वितीय क्रमांक तळवडे लांजा-अ.
, तर तृतीय क्रमांक लांजा हायस्कूल, संघाने पटकावला. चतुर्थ क्रमांक-₹ राजापूर-अ. संघाणे मिळविला. उत्कृष्ट संरक्षण- प्रसाद पाष्टे(तळवडे, लांजा), उत्कृष्ट आक्रमक- करण बालदे (संगमेश्वर), अष्टपैलू खेळाडू- आर्यन बालदे(संगमेश्वर), उगवता सितारा- प्रयाग नामये(तळवडे, लांजा), लक्षवेधी खेळाडू- हर्षद पर्शराम(संगमेश्वर) यांची निवड करण्यात आली.
खुला गटात मुलांमध्ये
प्रथम क्रमांक संगमेश्वर-ब, द्वितीय क्रमांक सनगलेवाडी, संगमेश्वर, तृतीय क्रमांक कणगवली, लांजा-अ तर चतुर्थ क्रमांक विलवडे, लांजा संघाने मिळवला. उत्कृष्ट संरक्षक- आशिष बालदे(संगमेश्वर), उत्कृष्ट आक्रमक- निखिल सनगले(सनगलेवाडी, संगमेश्वर), अष्टपैलू खेळाडू- प्रतीक बालदे (संगमेश्वर), लक्षवेधी खेळाडू- विराज निवाते(विलवडे, लांजा) आणि सिद्धांत कानडे (कणगवली, लांजा) यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम चार क्रमांकांना व वैयक्तिक पुरस्कार प्राप्त खेळाडूंना चषक आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून समीर काबदूले, कृष्णा करंजळकर, सुशील वासुरकर, आकाश सोळंकी, पांडुरंग पेडणेकर, विजय कलकुटकी, समीर खोमणे, प्रशांत देवळेकर आणि अभिजीत कदम यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शेखर गुरव, प्रीतेश भूरवणे, प्रतीक गुरव, ओंकार उबारे, बाळकृष्ण उबारे, संदेश उबारे, शैलेश गुरव, सुशांत भुरवणे,अनंत कळंबटे, संदीप घवाळी क्रीडा शिक्षक अभिजीत कदम, मुख्याध्यापक शिवाजी बंडगर आणि सहकारी, संस्था पदाधिकारी व आजी-माजी विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.