रायगड : रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात एक लहान सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधम तरुणाने शारीरिक अत्याचार केल्याची संताप जनक घटना घडली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये उमटले असून पोलिसांनी २४ तासात आरोपीला अटक केली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की २७ डिसेंबर रोजी पीडित मुलगी आणि तिचा भाऊ गावाजवळ असलेल्या निर्जन ठिकाणी शौचास गेले होते. या ठिकाणी पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिला एकटीलाच समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या बोटीत नेले आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. हा प्रकार तिने आपल्या घरी सांगितल्यानंतर तिच्या पालकांनी रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली . त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने पीडित मुलीला बोटीमध्ये नेले आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केला याबाबत तिने कोणालाही सांगू नये म्हणून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती, तसेच घरी जाऊन होडीचा गळ गुप्तांगाला लागला आहे असे सांगण्यात भाग पाडले तिच्या हातावर मारहाण केल्याच्या खुणा देखील असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मुरुड पोलीस अधिक तपास करीत असताना आरोपी त्याच्यात घरामध्ये माळ्यावर लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना समजतात मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एमपी शिंदे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी त्याचबरोबर हा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीमती रूपाली पेरेकर यांनी केली आहे.
राज्यामध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण वाढला असल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये भीती व्यक्त केली जात आहे बदलापूर कल्याण या शहरांमध्ये अशा प्रकारच्या घटना नुकत्याच घडल्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यामध्ये घडली असल्याने याचे तीव्र पडतात संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहेत.