देवरुख : येथे गोव्यातील एका ट्रक चालकाने देवरुखातील महिलेला धडक दिली होती. या धडकेत महिलेच्या पायावरून चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. वनिता तुकाराम झोरे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
वनिता यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना मदत मिळण्यासाठी मनसेने धाव घेतली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गोवा येथील गाडी मालकाकडून मनसे स्टाईलने झोरे कुटुंबाला तात्काळ मदत मिळवून दिली. या मदतीबद्दल झोरे कुटुंबाने मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे व देवरुख येथील मनसे पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष व माजी नगरसेवक श्री अनुराग कोचिरकर, मनसे देवरुख शहराध्यक्ष श्री सागर संसारे, मनविसे शहराध्यक्ष श्री ऋतुराज देवरुखकर, मनसे विभाग अध्यक्ष श्री अक्षय झेपले, सचिव तुषार बांडागळे, शाखाध्यक्ष श्री ओंकार विंचू, महाराष्ट्र सैनिक दिपक शिंदे आदी मदतीसाठी उपस्थित होते. याकामी देवरुख पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. अतुल जाधव यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.