रत्नागिरी:-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने गणपतीपुळे येथे सुरू असलेल्या मिनी सरस व प्रदर्शनात जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय पथक कार्यरत करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांचे सूचनेनुसार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव यांच्या मार्गदर्शनाखाली मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे महिला बचतगट सदस्य व भेट देणाऱ्या ग्राहकांना तातडीने आरोग्यसेवा तसेच प्रथमोपचार मिळावा, यासाठी हे पथक काम करत आहे.
आरोग्य सेवा देण्यासाठी पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव, आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर, समुदाय आरोग्य अधिकारी मनाली तारवे, आरोग्य सेवक विक्रांत जाधव, आरोग्य सेविका अश्विनी गोवळकर, मदतनीस सांची गावणकर, आशा सेविका सारिका गावणकर आदी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राहुल देसाई तसेच जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख यांनी आरोग्य पथकास भेट देऊन आरोग्य पथकामार्फत देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.