गुहागर /प्रतिनिधी:-गुहागर तालुक्यातील वरवेली गावाची जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले नळ पाणी योजनेचे काम अद्याप प्रलंबित असून सदर काम पूर्ण करण्याकरिता एक जानेवारी 2025 रोजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी निर्मल ग्रामपंचायत वरवेलीच्या वतीने गुहागर पंचायत समिती आवारामध्ये ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत.
ग्रामपंचायत वरवेलीच्या सरपंच मृणाल विचारे यांनी 13 डिसेंबर रोजी गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले होते यामध्ये वरवेली गावासाठी सुरू असलेला जलजीवन अंतर्गत नळ पाणी योजनेचे काम सातारा जिह्यातील माण तालुक्यातील शिंगणापूर येथील मे भिवाई कंट्रक्शन यांनी घेतले आहे सदर काम पूर्ण करण्याबाबत गेली वर्षभर ग्रामपंचायत पाठपुरावा करत आहे 21 जून 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत आयोजित केलेल्या आढावा सभेमध्ये ही सदर काम 15 ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण करतो असे ठेकेदार यांनी कबूल केले होते परंतु अजूनही नळ पाणी योजनेचे काम प्रलंबित आहे दरम्यान काम पूर्ण न केल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थांसमवेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुहागर पंचायत समितीच्या आवारामध्ये उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे यामुळे गुहागरमध्ये नववर्षाचे स्वागत अर्धवट कामाच्या पूर्तते करता उपोषणाच्या मार्गाने होणार आहे