दापोली : तालुक्यातील ओळगाव विजय शंकरवाडी येथील सुधाकर गणपत मांजरेकर या 38 वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.
या बाबत दापोली पोलीस ठाणेत लक्ष्मण दौलत मांजरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर मांजरेकर हे 30 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास ओळगाव कातळखळा येथे केबलने जंगली झाडाच्या फांदीला गळफास लावून घेतलेल्या स्थितीत आढळले. आत्महत्या करण्यामागील नक्की कारण अद्याप समजलेले नाही. दापोली पोलीस ठाणेत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गुजर करीत आहेत.