रत्नागिरी : नागपूर येथून कुटुंबासमवेत पर्यटनासाठी रत्नागिरीत आलेल्या तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. सचिन श्रीकृष्णराव तेलरांधे (45, ऱा. मनीषनगर-नागपूर) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसात करण्यात आली आहे.
सचिन तेलरांधे हे नागपूर येथून ट्रेनने रत्नागिरी येथे पर्यटनासाठी आले होते. रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे अचानक त्यांच्या छातीमध्ये दुखू लागले. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल केले. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी नोंद रत्नागिरी शहर पोलिसात करण्यात आली आहे.