आंतरराष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलनात संशोधनपत्रिकेचे सादरीकरण, महाराष्ट्रातून ११ संशोधक सहभागी
मार्गताम्हाने/वार्ताहर
देवभूमी ओळखल्या जाणाऱ्या केरळ येथे आंतरराष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन २८ डिसेंबर रोजी संपन्न झाले. या संमेलनात चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील डॉ.तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयाचे हिंदी विषयाचे प्राध्यापक युवराज जाधव यांनी ‘रमणिका कहानी साहित्य में चित्रित नारी विमर्श’ या विषयावर संशोधन पत्रिका प्रस्तुत केली. या संशोधनपर उपक्रमाचे सादरीकरण झाल्याने उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
या संमेलनात महाराष्ट्रातून एकूण 11 संशोधकासह देश- विदेशातील हिंद दिग्गजप्रेमी उपस्थित होते. यामध्ये एकूण 52 संशोधकांनी आपले संशोधन पेपर प्रस्तुत केले. यावेळी महाराष्ट्रातील एस.एन.डी.टी. महाविद्यालय, मुंबई येथील डॉ. सविता तायडे, नांदेड येथील डॉ. काझी एम के सर, डॉ.जाहिरुद्दीन पठाण यांनी संशोधनपत्रिका प्रस्तुत केली. विकल्प तृशूर, केरळ रवींद्रनाथ टागोर विश्वविद्यालय, भोपाळ मध्यप्रदेश व डॉ. सी. व्ही. रामन
विश्वविद्यालय विलासपूर, छत्तीसगड यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष रवींद्रनाथ टागोर विश्वविद्यालय, भोपाळ ,मध्यप्रदेशचे कुलाधिपती तसेच हिंदीचे वरिष्ठ कवी, कथाकार डॉ. संतोष चौबे, केरळ साहित्य अकादमीचे पूर्व सचिव व केरळ संगीत नाटक अकॅडमीचे डॉ. पी. व्ही. कृष्णन नायर यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संमेलनाच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन हिंदीचे वरिष्ठ कथाकार मधु कांकरिया यांनी केले. मधु कांकरिया यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिंदी साहित्याचे वाढते महत्त्व व जगभरातील प्रेम याबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. के .जी प्रभाकरन यांनी दक्षिण भारतीय हिंदी साहित्य
संमेलनातील आलेल्या सर्व हिंदी प्रेमींचे स्वागत केले. चौबे यांनी
हिंदीचे अनुप्रयोग बाबत 6 सिद्धांतांचे महत्त्व पटवून देत समाजातील हिंदी अनुप्रयोग वापराबाबत बाबत परिनिष्ठित शब्दांचे महत्त्व पटवून दिले. या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्ससाठी एकूण 52 संशोधकांनी लिहिलेले पुस्तिका जनविकल्प -18 पुस्तक प्रकाशन विमोचन करण्यात आले.