खेड : तालुक्यातील किंजळे तर्फे नातू धनगरवाडी रस्त्याची पाहणी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे व पदाधिकारी यांनी नुकतीच केली असून ना. योगेश कदम यांच्या आदेशाने दि.31 रोजी या रस्त्याचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
खेड तालुक्यातील तळे येथे गुरुवार दि.26 रोजी दुचाकी व मोटार अपघातात एक तरुणाचा मृत्यू झाला होता. त्या तरुणाचा मृतदेह कींजळे तर्फे नातू धनगरवाडी येथे रस्ता नसल्याने चालत न्यावा लागला. त्यामुळे माध्यमांतून या रस्त्याकडे लक्ष वेधण्यात आले. शिवसेना तालुका प्रमुख श्री धाडवे, महेंद्र भोसले, राजेंद्र शेलार यांच्यासह पदाधिकारी यांनी रस्त्याची पाहणी केली.
यावेळी श्री धाडवे म्हणाले, सदर रस्त्यासाठी दोन टप्प्यांत वीस लाख रुपयांचा निधी मंजूर आहे.गृहराज्य मंत्री ना. योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला आहे.स्थानिक अडचणीमुळे दोन वर्षापासून निधी पडून आहे. परंतु आता त्या सोडवण्यात आल्या आहेत. ना.कदम यांच्या आदेशाने रस्त्याचे काम सोमवार दि 30 पासुन सुरु होणार आहे, अशी माहिती धाडवे यांनी दिली.