पटणा पायरेट्सला 32-23 फरकाने नमवलं
मुंबई:-प्रो कबड्डी लीगच्या ११ हंगामात हरियाणा स्टीलर्सने विजेतेपद पटकावले. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमध्ये पार पडलेल्या या सामन्यात हरियाणा स्टीलर्स संघाने ९ गुणांनी बाजी मारली.
हरियणा स्टीलर्स संघाने सुरूवातीपासूनच पटना पायरेट्सवर वर्चस्व राखले आणि मागचे सलग दोन वर्ष फायनमध्ये येऊन अपयशी होणाऱ्या हरियाणा स्टीलर्स संघाने यावेळी मात्र ट्रॉफी वर आपले नाव कोरले.
पहिल्या सत्राचा खेळ अंत्यत चुरशीचा झाला. हरीयाणा स्टीलर्सचे पटना पायरेट्सवर वर्चस्व राहिले. पण गुणांमध्ये फारसा फरक नव्हता, पटणाने सात्त्याने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या सत्रात शेवटच्या २ मिनिटात पटणाने संघावरचा ऑल आऊट वाचवला. नवीन रावल हरीयाणा स्टीलर्ससाठी डू ऑर डायमध्ये गुण घेऊन आला. त्यानंतर हरीयाणाच्या डीफेन्सनेही कमाल केली.पण पुढील रेडवर पटणाच्या दोन खेळाडूंनी सुपर टॅकल करत दोन गुण मिळवले व संघावराचा ऑल आऊट टाळला. हरियाणाच्या आक्रमक डिफेंसमुळे मध्यंतरापर्यंत हरियाणा स्टीलर्सकडे ३ गुणांची आघाडी राहिली, १५-१२ असे गुणफलक होते.
दुसऱ्या सत्रात सुरूवातीची काही मिनीटे हरियाणाने ३ गुणांची आघाडी कायम ठेवली. त्यानंतर पटणाच्या गुरदीपने हायफाय पुर्ण केला. पण हारियाणाच्या डिफेंसला आघाडी कायम ठेवण्यात यश आले. ७ व्या मिनिटात शादलुने चतुराई दाखवत चढाई केली. त्यानंतर हरियाणाच्या डिफेंसने कामगिरी बजावत पटणाला ऑल आऊट दिला. हरियाणा स्टीलर्स संघाने शेवटच्या ५ मिनिटात ८ गुणांची आघाडी घेतली.
शादुलने या हंगमातला पाचवा हायफाय देखील पुर्ण केला. शेवटच्या दीड मिनिटात हरियाणाकडे ८ गुणांची आघाडी होती. हरियाणा संघाने शेवटच्या मिनिटापर्यंत पटणावर वर्चस्व राखले आणि सामना ३२-२३ गुणांनी जिंकत प्रो कबड्डी ११ व्या हंगामाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.