चिपळूण:-संघर्ष क्रीडा मंडळाने फ्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी रविवारी आयोजित केलेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत देशभरातील शेकडो स्पर्धक धावले. या स्पर्धेतील 21 किलोमीटर पुरूष गटात मुकेश चौधरी तर महिला गटात साक्षी जड्याळ विजेते ठरले. त्यांच्यासह अन्य विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्याहस्ते रोख रक्कम, चषक देऊन गौरवण्यात आले.
माजी खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे या स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यानंतर स्पर्धकांनी धावण्यास सुरूवात केली. विशेष म्हणो राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा वेळेत सुरू होऊन वेळेतच संपली. त्यामुळे फ्लास्टिकमुक्तीसह वेळेचे महत्वही या स्पर्धेने पटवून दिले.
स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणेः
21 किलोमीटर पुरुष गट- मुकेश चौधरी प्रथम, सिद्धेश वारजे द्वितीय, दिव्यांशू कुमार तृतीय.
महिला गट- साक्षी जड्याळ प्रथम, अर्चना जाधव द्वितीय, फुलन पाल तृतीय,
21 किलोमीटर 31 ते 40 वयोगट
पुरुष-कमल सिंग, अनंत गोवेकर, अनिल कोरवी, महिला गट-सोनिया प्रामाणिक
41 ते 50 पुरुष गट
परशुराम भोई, मनजित सिंग, अनंत टानकर, महिला गट-सीमा वर्मा, स्मिता शिंदे, अंजली तिवारी,
51 ते 60 पुरुष गट
अनिल टोकरे, रवींद्र जगदाळे, रणजित कनबरकर, महिला गट-ज्योती खणीकर, संगीता ठोकळे,
61 वर्षावरील पुरूष गटात
पांडुरंग चौगुले, महिपाल सिंग, विश्वनाथ शेट्ये, महिला गट-लता अलीमंचनंदानी, सुलता कामत,
10 किलोमीटर खुला गट
सतीश कासले, सुरज कदम, ओंकार चांदिवडे
महिला गट- प्रमिला पाटील, वंदना मौर्य, प्रतिमा पाल,
31 ते 40 पुरुष गट
शशी दिवाकर, राजा पिरंगणवार, संदीप पवार, महिला गट-विजया खाडे, सुरभी शर्मा, रेखा कोचले यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले.
10 किलोमीटर 41 ते 50 पुरुष गट
सुनील शिवने, राजेश कोंजार, योगेश जाधव, महिला गट-अनिता पाटील, अलका पाटील, प्रतिभा नाडकर
51 ते 60 पुरूष गट
पांडुरंग पाटील, विठ्ठल आरगाडे, बाळकृष्णन टी, महिला गट-बी. एच. विद्या, नॅन्सी पिंटो, सनिता संजय कदम
61 वर्षावरील पुरुष गट
संजय पाटील, उदय महाजन, राजेंद्र महाजन, महिला गट-पी. सी. पार्वथी,
5 किलोमीटर खुला पुरूष गट
ओंकार बैकर, दीपेश जाधव, आदित्य धुळप, महिला गट-श्रुती दुर्गावळी, युगंधरा मांडवकर, दीप्ती आंब्रे,
31 ते 40 पुरूष गट
उमेश खेडेकर, प्रसाद दळी, विकास चांदे, महिला गट- गौरी आलेकर, रोहिणी सूर्यवंशी, श्रीरस्त नामदेव
41 ते 50 पुरुष गट
बुरटे, अहमद अली शेख, शंकर कदम, महिला गट-कल्पना हरेकर, वर्षा खानविलकर, कविता परुळेकर
51 ते 60 पुरुष गट
डॉ.सुनील निकम, ज्ञानेश्वर पवार, शंकर सातपुते, महिला गट-सायली निकम, सुष्मिता विखारे, ज्योती परांजपे हे पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी ठरले.
61 वर्षावरील पुरुष गट
दीपक आलेकर, संजय शिंदे, मिलिंद मुद्राळे, महिला गट- उमा आलेकर, शालन रानडे, नूतन देवधर
5 किलोमीटर शालेय पुरूष गट
रोहित राठोड, दिवेश शिंदे, रोहन राठोड, महिला गट-हुमेरा सय्यद, अनुजा पवार, कस्तुरी भनशे
14 ते 16 पुरूष गट
रोहन राठोड, प्रतिक देवरे, सोमदेव दिलीप, महिला गट-हुमेरा सय्यद, अनुजा पवार, कस्तुरी भनशे
16 ते 18 पुरूष गट
रोहित राठोड, दिवेश शिंदे, साहिल चिनकटे, महिला गट-अनुश्री आमकर, अदिबा तंबू, शितल खळे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले.
या सर्व विजेत्यांना अर्जून पुरस्कार विजेते अशोक शिंदे, मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम, आयर्नमॅन डॉ. तेजानंद गणपते, राजू भागवत, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे नियामक समितीचे चेअरमन बाबू तांबे, मंडळाचे प्रमुख भाऊ काटदरे, बाळा कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्याहस्ते गौरवण्यात आले. सूत्रसंचालन अभिनेत्री ऐश्वर्या नागेश हिने केले.