लांजा : मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ घाटामध्ये बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान मुंबई ते गोवाच्या दिशेने डिझेल घेऊन जात असताना अवघड वळणाचा अंदाज न आल्यामुळे कंटेनर महामार्गाच्या मधोमध कलांडला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती.
हातखंबा पोलीस व लांजा पोलीस यांच्या अथक प्रयत्ननंतर तीन तासानंतर कंटेनरला बाजूला करण्यात आले.
मुंबईच्या दिशेने व गोवाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या वेरळ घाटामध्ये रांगा लागल्या होत्या. मुंबई गोवा महामार्गावरील वेळ घाटाच्या मध्यभागी कंटेनर कलंडला होता. हातखंबा पोलीस व लांजा पोलिसांच्या मदतीने दोन क्रेनच्या सहायाने कंटेनरला बाजूला करण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. सकाळी दहा ते वाजता कोसळलेला कंटेनर त्यामुळे हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू होती. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण काम पूर्ण होईपर्यंत लांजा तालुक्यातील वेरळ घाट अवजड वाहनांसाठी डेंजर झोन ठरत आहे.