पुणे : पुढारी वृत्तसेवा उद्योगांना कुणी त्रास देत असेल, तर त्यांच्याबर कडक कारवाई करण्यात येईल. राज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचे आमच्या सरकारचे उद्दिष्ट आहे. तसेच, राज्यभर उद्योग भवन उभारण्याचे काम हाती घेणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी सामंत म्हणाले, गडचिरोली, मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणूक आणि प्रकल्प आम्ही आणले. माझ्या मतदारसंघात देखील एक मोठा कारखाना येत आहे. पुणे, गडचिरली, रत्नागिरी, कल्याण डोंबिवली या जिल्ह्यांना टाटासमूहाकडून सीआरएसमधून ५०० कोटी रुपयांचे प्रकल्प होत आहेत. उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असल्याचा विरोधकांनी फेक नरेटिव्ह सेट केला होता. कुठलाच उद्योग राज्याबाहेर गेला नाही. त्यांच्या काळात काम झाले नाही म्हणून हे प्रकल्प बाहेर गेले. चर्चा न झाल्याने त्यांच्या काळात एयर बस हा प्रकल्प गेला. याबाबत व्हाइट पेपर का काढला नाही, असा प्रश्न सामंत यांनी उपस्थित केला. राज्यातील स्थानिक मराठी माणसाला त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करू, महाराष्ट्र हा सगळ्या जातींना घेऊन चालणारे राज्य असल्याचे सामंत यांनी या वेळी सांगितले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत आमदार अतुलबाबांचा विमान प्रवास- उदय सामंत, उद्योग व मराठी भाषामंत्रीमराठी भाषा ही मातृभाषा असून, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. या विभागाचे मंत्रिपद मिळाले, याचा अभिमान आहे. मंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर या खात्याचा आढावा घेणार असून, विश्व साहित्य संमेलन कुठे घ्यायचे, अखिल साहित्य संमेलनाचे निमंत्रित कोण असतील, याबाबत चर्चा होईल. मराठी भाषा व्यवहारासह सर्व क्षेत्रांत वापरली जावी यासाठी काम करणार आहोत.