अनिकेत जाधव / चिपळूण:-जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग रत्नागिरी तसेच तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती व चिपळूण नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मा. कमांन्डन्ट एनडीआरएफ, पुणे यांचेमार्फत रत्नागिरी जिल्ह्यात एक दिवसीय Training Boat Handlers for water Emergencies या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणा दरम्यान प्रथमोपचार, पुर आपत्ती व्यवस्थापन, CPR, बोट चालविणे, पाण्यावर तरंगणारे घरगुती साहित्य तयार करणे इ. प्रकारच्या विषयांवर NDRF टिम कडून नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तरी चिपळूण तालुक्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन चिपळूण नगर परिषदे तर्फे करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठिक १०.०० वा. गोवळकोट धक्का, चिपळूण येथे आयोजित करण्यात आले आहे.