मंडणगडमध्ये भव्य स्वागत व सत्कार
मंडणगड (प्रतिनिधी) : परमपूज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यभूमीला ४९ वर्षानंतर मंत्रिपद देवून शिवसेनेसह महायुती सरकारने खऱ्या अर्थाने न्याय दिला असल्याचे प्रतिपादन गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांनी केले. भिंगलोळी येथे श्रीकृष्ण हॉलमध्ये संपन्न झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी कदम म्हणाले की, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री होणे ही सोपी गोष्ट नाही, मात्र, सर्व मतदारांनी मला निवडून देत आमदार केलेत म्हणून मी आज मंत्री होवू शकलो. त्यामुळे सत्कार माझा होत असला तरी हा प्रत्येकाचा सत्कार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मिळालेली सर्व खाती ही कोकणाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची खाती आहेत. या माध्यमातून कोकणासह मतदार संघाला न्याय देण्याचे काम भविष्यात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘घार हिंडते आकाशी…चित्त तिचे पिल्लापाशी’ प्रमाणे जरी मी मंत्री म्हणून महाराष्ट्रात फिरत असलो तरी माझ्या मतदार संघातील प्रत्येक गावाकडे माझं लक्ष कायम राहणार आहे. विधानसभाक्षेत्र प्रमुख आदेश केणे, संदेश चिले, तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, सुधीर कालेकर, शशिकांत चव्हाण, सचिव सिद्धेश देशपांडे, युवा सेना कार्यकारणी सदस्य चेतन सातोपे, शहर प्रमुख विनोद जाधव, नगरसेवक योगेश जाधव, अनंत लाखन, सुलतान मुकादम, प्रतिक पोतनीस, संजय शेडगे, गजानन तांबुटकर, इरफान बुरोंडकर, दीपक मालुसरे, अह्म्मद मुकादम, अजहर मुकादम, संतोष पार्टे, रामदास रेवाळे, राकेश गायकवाड,प्रवीण जाधव, नागेश घोसाळकर, राजा लेंडे, विकास पवार, पंकज घाग, राहुल पारेख, अमिता शिंदे, अस्मिता केंद्रे, प्रमिला किंजळे, शेजल गोवळे, भाजप तालुकाध्यक्ष आप्पा मोरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर, रीपाईचे आदेश मर्चंडे, समद मांडलेकर तसेच ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, बांधकाम विभाग, नगरपंचायत अधिकारी, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.