ठाणे येथील विभागीय वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यांची मंडणगड शहरात कारवाई
मंडणगड : तालुक्यातील दोन राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या अनधिकृत ओव्हरलोड बॉक्साइट वाहतूक प्रकरणी ठाणे येथील विभागीय वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यानी मंडणगड शहरात धडक कारवाई केली. या कारवाईचा अधिकचा तपशील प्राप्त झालेला नसला तरी भिंगळोली येथील एसटी आगार परिसरात अधिकाऱ्यानी ताब्यात घेतलेले दोन डंपर ठेवण्यात आले आहेत.
तालुक्यातील जवळजवळ सर्वच रस्त्यांचा वापर करून गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेल्या ओव्हरलोड बॉक्साईट वाहतूक प्रकरणी स्थानिक पातळीवर अनेक सामाजिक संघटना, संस्था, राजकीय पक्ष व नागरिकांनी वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी संबंधित अधिकाऱ्याना देऊनही यासंदर्भात स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यानी वेळोवेळी दुर्लक्ष केले आहे. मात्र मंगळवारी थेट ठाणे येथील विभागीय वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यानी मंडणगड येथे येऊन कारवाई केली.