गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी मानले उद्योग मंत्र्यांचे आभार
रत्नागिरी :-भविष्यात तालुका निहाय एमआयडीसी विकसित करण्याचा विचार असल्याचे सुतवाच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केल्यानंतर या भूमिकेचे स्वागत गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बेरोजगारी दूर करण्यासाठी तालुका निहाय एमआयडीसीचा विकास व्हावा यासाठी गाव विकास समितीच्या माध्यमातून मागील काही वर्षापासून लक्षवेधी आंदोलने करण्यात येत असून तालुका निहाय एमआयडीसी विकास हा विषय गाव विकास समितीने लावून धरला होता. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून उद्योग मंत्र्यांनी यादृष्टीने विचार करून भूमिका मांडल्याने गाव विकास समिती म्हणून आम्ही त्यांचे आभार मानतो असे गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी म्हटले आहे.
याविषयी बोलताना उदय गोताड म्हणाले की ,गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांच्या विचाराने मागील काही वर्षापासून रत्नागिरी जिल्ह्यात तालुका निहाय एमआयडीसी विकसित झाल्या पाहिजेत यासाठी गाव विकास समिती या एकमेव संघटनेने आंदोलन केली. एमआयडीसी विकासाचा विषय लावून धरला.या निवडणुकीत सुद्धा तालुका निहाय एमआयडीसी विकास हा मुद्दा गाव विकास समितीने अग्रणी ठेवला. गाव विकास समितीने मांडलेले मुद्दे आज शासन यंत्रणेला समजत असतील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी तालुका निहाय एमआयडीसी विकासाचे धोरण भविष्यात राबवले जाईल असे सुतवाच उद्योग मंत्री करत असतील तर शासनाचे आपण सर्वांनी आभारच मानायला हवेत असे उदय गोताड म्हणाले. तालुका निहाय एमआयडीसी विकासाचे धोरण प्रत्यक्षात कृती येवो आणि तालुका निहाय एमआयडीसीचा विकास होवो हीच अपेक्षा हेही गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी म्हटले आहे.