मुंबई:-आपल्या अभिनयाने तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. त्यांनी अनेक चित्रपटात सहज सुंदर अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप पाडली.
एक आदर्श सून म्हणून त्यांची प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख आहे. गेल्या काही वर्षात त्या मालिकांमध्येही दिसल्या. त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आता त्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याचं कारणही तसंच आहेत. अलका यांनी चक्क त्यांची मुलगी पायलट असलेल्या विमानातून प्रवास केलाय. आपला आनंद त्यांनी चाहत्यांसोबतही शेअर केलाय.
अलका कुबल या सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्या त्यांच्या कामासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चाहत्यांना माहिती देत असतात. आता त्यांनी केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. त्यांनी त्यांची मुलगी पायलट असलेल्या विमानातून प्रवास केलाय. त्यांची मोठी मुलगी ईशानी पायलट आहे. ती वैमानिक म्हणून काम करतेय. ती उडवत असलेल्या विमानात अलका कुबल यांना प्रवास करण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने त्यांनी एक पोस्ट शेअर केलीये.
त्यांनी आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर केलाय. यात त्या मुलीसोबत पायलटच्या रूममध्ये ,म्हणजे कॉकपीटमध्ये दिसतायत. त्यांनी हा फोटो शेअर करत लिहिलं, ‘ही आहे माझ्या आजच्या विमानाची कॅप्टन.’ त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांसोबतच अनेक कलाकारांनी देखील मायलेकींचं कौतुक केलंय. सुकन्या मोने यांनी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद असं लिहीत त्यांचं कौतुक केलंय. तर ऋतुजा देशमुख यांनी वाव असं म्हटलं आहे.
अमेय वाघ, सुकन्या मोने, पल्लवी पाटील, चैत्राली गुप्ते, हेमंत ढोमे यांसारख्या अनेक कलाकारांनी या पोस्टवर कमेंट करत अलका कुबल यांच्या लेकीचे कौतुक केलं आहे. अलका कुबल यांना दोन मुली आहेत. पण आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात न येता त्या दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. काही वर्षांपूर्वीच त्यांची मोठी मुलगी ईशानी पायलट झाली.