नवी दिल्ली:-बांग्लादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या अंडर-19 महिला आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला अंडर १९ क्रिकेट टीमने चमकदार खेळ करत भारतीय संघाने बांग्लादेशचा पराभव केला आहे.
या विजयाबरोबरच भारताने अंडर-19 महिला आशिया कप स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 117 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संघ केवळ 76 धावांवर सर्व बाद झाला आणि भारताने हा सामना 41 धावांनी जिंकला आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावून 117 धावा केल्या होत्या. यावेळी टीम इंडियासाठी गोंगडी त्रिशा ही एकमेव फलंदाज होती, जिने 20 धावांचा टप्पा ओलांडली. तिने 47 चेंडूत 5 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 52 धावांची शानदार खेळी केली. संघाचे पाच फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. तिच्या या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाला २० ओव्हर्समध्ये ११७ धावा करता आल्या. मिथिला विनोदने १७ तर कर्णधार निकी प्रसादने १२ धावा केल्या.तर बांग्लादेशकडून फरझाना इस्मीनने सर्वाधिक 4 बळी घेतले.
118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला बांगलादेशचा संघ सुरुवातीपासूनच हतबल होताना दिसत होता. यावेळी बांग्लादेशचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. झुरिया फिरदौसने सर्वाधिक 22 धावा केल्या आणि तिच्याशिवाय फक्त फहमिदा चोया (18) हिने दुहेरी आकडा गाठला. इतर फलंदाजांनकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. बांग्लादेश संघाचे 9 फलंदाज केवळ एक अंकी धावा करू शकले. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली.आयुषी शुक्लाने तीन तर पारुनिका सिसोदिया आणि सोनम यादवने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. १८.३ ओव्हर्समध्येच बांग्लादेशचा संघ ७६ धावांवर ऑल आउट झाला आणि भारतीय संघाने ४१ धावांनी हा सामना जिंकला. याआधी बांग्लादेशच्या पुरुष क्रिकेट संघाने भारताचा पराभव करून आशिया कप जिंकला होता. या पराभवाचा बदला भारतीय महिला क्रिकेट संघाने घेतला.