जर्दाळू खाण्याचे खूप फायदे आहेत, वाळलेल्या जर्दाळूचा उपयोग आपल्या रोजच्या आहारात केल्यास अनेक आजार टाळता येतात.त्यामध्ये आवश्यक पोषक घटक असून ते मधासोबत खाल्ल्यास त्याचा जास्त फायदा होतो.
हे फळ अत्यंत बहुगुणी आहे.
जर्दाळू मधासोबत खाल्ल्याने हृदय निरोगी राहते आणि पोटही चांगले साफ होते.
पोटॅशियम, फायबर आणि फिनोलिक आणि कॅल्मियमचा भरपूर स्त्रोत असल्यामुळे वाळलेल्या जर्दाळूचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचे मधासोबत सेवन केल्याने आरोग्याला अधिक फायदा होतो.
कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन ए, बी, सी, लोह, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम देखील मधामध्ये आढळतात.
उच्च रक्तदाबाची समस्या असली तरीही सुक्या जर्दाळूचे मधासोबत सेवन करू शकता.
जर्दाळूमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
वाळलेल्या जर्दाळूचे मधासोबत सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि पोटही व्यवस्थित साफ होते
सुक्या जर्दाळूसोबत मध खाल्ल्यानंतर शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळते.
याशिवाय वाळलेल्या जर्दाळू आणि मधाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.