रत्नागिरी : तालुक्यातील निवळी मालपवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने बाहेर काढून जीवदान दिले.
19 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 06.30 वाजताच्या दरम्यान निवळी मालपवाडी येथे श्री. वसंत देमु मालप यांचे खाजगी स्वतंत्र विहिरीत भक्ष्याचे शोधात असलेला बिबट्याचा बछडा विहिरीतील पाण्यात पडल्याचे प्रथम गोट्या मालाप व सुभाष मालप यांचे लक्ष्यात आल्यावर सुभाष मालप यांनी ही माहिती निवळी गावचे उपसरपंच संजय नीवळकर यांना दिली. त्यावेळी उपसरपंच हे लागलीच सदर विहिरीचे ठिकाणी पोहचून पाहणी करून खात्री झाल्यावर त्यांनी बिबट्याचा बछडा विहिरीत पडल्याची माहिती लागलीच ग्रामीण पोलीस ठाणे व वनविभागाला दिली असता तेथे तात्काळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी पीआय यादव, बिट अंमलदार कोकरे, भिसे तसेच वनविभागाचे अधिकारी श्री गावडे, राजेंद्र पाटील, श्री अनिकेत, श्रीमती कदम हे हजर झाले.
पिंजऱ्याच्या सहाय्याने व ग्रामस्थांच्या मदतीने वनविभाग व पोलिसांना बिबट्याच्या बछड्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले साधारण रात्री 11.30 वाजताच्या सुमारास बिबट्याच्या बछड्याला पिंजऱ्यात कैद करून विहिरीतून खुखरुपपणे बाहेर काढण्यात आले.
सदर ठिकाणी गावातील बरेच नागरिक उपस्थित होते. सुभाष मालप, गोट्या मालप, वैभव मुकादम, दीपक कोगजे, विनय मुकादम, राजू निवलकर, निलेश सावंत, विकास सावंत, प्रथमेश कोगजे, संजय जोशी, पोलीस पाटील संजना पवार व अन्य गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.