महिला आयोगाने घेतली दखल, अनेक महिला शिक्षकांनी केली होती तक्रार
रत्नागिरी : महिला शिक्षकांना त्रास देत मनात लज्जा उत्पन्न होईल असे असभ्य वर्तन करणाऱ्या एका अधिकाऱ्याविरोधात पीडित शिक्षिका एकवटले आहेत. बुधवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे त्या अधिकाऱ्यासंदर्भात तक्रारी मांडण्यात आल्या.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याच्या चौकशीची जबाबदारी आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवारी जिल्हा परिषदेकडून नेमण्यात आलेल्या चौकशी समितीकडून संबंधित शाळेत जाऊन त्या अधिकाऱ्याची आणि घडलेल्या घटनेची चौकशी करण्यात आली. शुक्रवारपर्यंत संबंधित प्रकरणातील चौकशीचा अहवाल मिळताच संबंधितावर त्वरित कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत काम करणारे एक अधिकारी गेले काही दिवस महिला कर्मचाऱ्यांचे कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण करत असल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडून आयोजित महिला आयोग आपल्या दारीच्या जनसुनावणीत करण्यात आली. यावर महिला आयोगाने त्वरित दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या अनेक दिवसापासून शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने मोठा हैदोस माजवला आहे. महिला शिक्षक आणि त्याच्या विरोधात प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या. मात्र त्यावर काहीच तोडगा करण्यात आलेला नाही. एका शिक्षकेला रोज शाळेत आलिशान गाडीतून सोडायला जाणारा हा अधिकारी उन्मत झाल्याची चर्चा सुरू आहे. त्या अधिकाऱ्यासोबत असणारे ही शिक्षिका महिला तीही अधिकच उन्मत झाली आहे. या दोघांचा भांडाफोड काही दिवसांपूर्वी झाला. आता हे प्रकरण दाबायचे कसे या विचारात असलेल्या त्या अधिकाऱ्याने शहरातील शाळेत जाऊन भांडाफोड करणाऱ्या त्या महिला शिक्षिकेला त्रास द्यायला सुरुवात केली. तिला अश्लील शब्दात बोलून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले त्यामुळे शिक्षक वर्गात संतापाची लाट आहे
शाळेत जाऊन एका महिला शिक्षकेला अश्लील शब्दात धारेवर धरत गैरवर्तन करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर एका शिक्षकेने लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर त्याचा बोभाटा झाला. या प्रकरणात जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्याची चौकशी लावली. चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर करण्यात आला मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीच कारवाई केली नाही त्यामुळे या लंपट अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेतील काही मंडळी पाठीशी घालत असल्याचे शिक्षक महिलांचे म्हणणे आहे.
घडलेल्या प्रकाराबाबत मुख्याध्यापिकेने जिल्हा परिषदेतील दोन वरिष्ठाकडे तक्रारी केल्या मात्र शिक्षकांचा भांडाफोड केला त्याकडे वरिष्ठ स्तरावरून दुर्लक्ष करण्यात आले.
दरम्यान त्या अधिकाऱ्याविरोधात आणखी एका शिक्षिकेने तक्रार केली होती तिनेही आपल्या अर्जात हा अधिकारी त्रास देत असल्याचे म्हटले आहे. आपल्या जाळ्यात अडकत नसल्याने या शिक्षिकेची सहा ते सात वेळा बदली केली असा आरोप देखील संबंधित शिक्षिकेने तक्रारीमध्ये केला आहे. वादग्रस्त ते अधिकाऱ्याचे कारणामुळे अजून सुरूच असून सायंकाळी सहा वाजता तो विनाकारण कर्मचाऱ्यांना बोलावून घेतो या प्रकारामुळे आता शिक्षकांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे, कारण या अधिकाऱ्याचे कारनामे सगळ्यांना माहित आहेत हा अधिकारी भलताच पोचलेला असल्याने त्यांनी नवनवीन फंडे अमलात आणले आहेत काही दिवसांपूर्वी एका शिक्षिकेचा वाढदिवस त्याने साजरा केला व आपल्या हाताने त्या शिक्षिकेला केक भरवल्याचा पोस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारानंतर बुधवारी महिला आयोगाकडे तक्रारीचा पाढा वाचण्यात आला. यावर आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत.