रत्नागिरी : तालुक्यातील गोळप येथे विषारी द्रव प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू झाला. विद्या विजय आंग्रे (४१,रा. गोळप धोपटवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. १२ डिसेंबर रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विद्या यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन विषारी द्रव प्राशन केले होते. यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. येथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले. येथे त्यांचा मृत्यू झाला.