रत्नागिरी : शहरातील राम आळी येथे दुचाकीला धडक देणाऱ्या कारचालकावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नीलेश प्रकाश हेबाळकर (४६, रा. अभ्युद्ययनगर रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. अपघाताची घटना ६ नोव्हेंबर रोजी घडली होती. यात दुचाकीवरील दोघाजणांना दुखापत झाली होती.
नीलेश हा ६ नोव्हेंबर रोजी कार (एमएच ०८ एएन १७४८) घेवून एसटी स्टँडकडून राम आळीकडे जात होता. रात्री १०च्या सुमारास रस्ता क्रॉस करत असताना समोरुन आलेल्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील (एमएच ०८ एए २२१६) साद बोरकर व शैबाज इस्माईल फणसोपकर (रा. राजीवडा, रत्नागिरी) हे जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणे कार, चालवल्याचा ठपका ठेवत नीलेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.