रत्नागिरी : गोव्यात प्रथमच घेण्यात आलेल्या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या एस.आर.के क्लबच्या खेळाडूंनी 8 सुवर्ण, 4 रौप्य, 4 कांस्यपदके पटकावली. या स्पर्धेत स्वरा साखळकर ( क्यूरोगी पुमसे ), मृण्मयी वायंगणकर, रोहित कुंदकर, स्वर्णिका रसाळ, यश भागवत, विधान कांबळे, सलोनी सुर्वे या खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवले.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित चौथी खुली राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा 2024 पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इनडोर स्टेडियम पेडम, म्हापसा, गोवा येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. या खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत देशाच्या विविध राज्यातून 650 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत स्वरा साखळकर (क्यूरोगी पुमसे), मृण्मयी वायंगणकर, रोहित कुंदकर, स्वर्णिका रसाळ, यश भागवत, विधान कांबळे, सलोनी सुर्वे या खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवले. रौप्य पदकावर अद्वैत मिश्रा, तुळजा हर्षे, प्रांजल लांजेकर, रावी वारंग यांनी नाव कोरल तर यज्ञा चव्हाण, गार्गी घडशी, तीर्था लिंगायत यांनी कांस्यपदक मिळवलं. याव्यतिरीक्त आयुष चव्हाण, निर्मित सावंत, श्रेयसी हातीसकरया खेळाडूंनीही स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.
गोवा येथील झालेल्या या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना,क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य वीरेश मयेकर, निखिल सावंत, कांचन काळे यांनी कौतुक केले.
या खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक शाहरुख शेख, मिलिंद भागवत यांचे मार्गदर्शन लाभले आहे.