रत्नागिरी : शहरातील कोकणनगर येथील शाळा नंबर 21 च्या समोर असलेल्या एका घराला रात्री 9 वाजता आग लागली. अग लागताच घरातील मंडळी बाहेर पडल्याने दुर्घटना टळली. मात्र बेडरुममधील साहित्य जळून मोठे नुकसान झाल्याचे समजते. ग्रामस्थ आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगर परिषदेचा अग्निशमन दलाशी संपर्क साधून बोलावण्यात आले आहे. नुकताच अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, रत्नागिरी शहरालगतच्या कोकण नगर येथे रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एका घराला शॉर्टसर्किटने आग लागली. घरातील मंडळी लगेचच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. आग लागल्याचे कळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मिळेल त्या भांड्यातून पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र आगीने रौद्ररूप धारण करताच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला बोलावण्यात आले आहे. अग्निशामनचा बंब घटनास्थळी दाखल झाला असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
आग नियंत्रणात आणण्यासाठी नगर नगर परिषदेचे कर्मचारी यशवंत शेलार, शिवम शिवलकर, वाहन चालक नरेश सुर्वे यांनी प्रयत्न केले.