सुवर्णसूर्य फाउंडेशनचे आयोजन, विजेत्यांना साडेचार लाखांची रोख रकमेची पारितोषिके
रत्नागिरी : कोकणवासियांनी कोकणवासियांची संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली मॅरेथॉन असे जिला संबोधलं गेलंय. त्या कोकण कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन दरवर्षीप्रमाणे नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी करण्यात आले आहे. येत्या 5 जानेवारी 2025 रोजी रत्नागिरी धावनगरी होणार असून नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी 5 कि.मी., 10 किमी आणि 21 कि.मी. अंतर असलेली कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन दरवर्षीप्रमाणे सुवर्णसूर्य फाउंडेशनने आयोजित केली आहे.
मागील वर्षी मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा होणार असून स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे. या स्पर्धेत विजेत्यांना 4 लाख 50 हजार रुपयांची रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. रन फॉर बायोडायव्हर्सिटी अशी संकल्पना घेऊन दुसऱया वर्षीची ही स्पर्धा होणार आहे. 5 कि.मी.साठी 70 मिनिट, 10 कि.मी. 120 मिनिटात आणि 21 कि.मी. अंतर 210 मिनिटांत पूर्ण करायचे आहे. स्पर्धेची सुरूवात थिबा पॅलेस रोडवरील हॉटेल मथुरा येथून होईल. 21 किलोमीटरसाठी नाचणे, काजरघाटी, सोमेश्वर, वेसुर्ले, कोळंबे, फणसोपमार्गे भाटयेे समुद्रकिनारा असा मार्ग आहे. 10 किमीसाठी नाचणे, शांतीनगर व वळसा मारून मारुती मंदिर मार्गे भाटये आणि 5 किमीसाठी मारुती मंदिर, नाचणे पॉवर हाऊस येथून वळून पुन्हा त्याच मार्गाने भाटयेे पर्यंत स्पर्धक येतील. या स्पर्धाया प्रॅक्टीस रनलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
रत्नागिरी जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने होत असणारी ही मॅरेथॉन आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. तसेच हॉस्पिटॅलिटी पार्टनर रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन असून रूट पार्टनर रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आहे. स्वच्छता पार्टनर रत्नागिरी नगर परिषद आहे. तसेच अनबॉक्स हे या उपक्रमाचे एचटूओ पार्टनर आहेत. कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातूनही या उपक्रमाला भरीव प्रोत्साहन मिळाले आहे. नोंदणीसाठी शेवटचे 7 दिवस शिल्लक असून रजिस्ट्रेशन लिंक ः
https://events.fitasf.com/konkan-coastal-2025.html2025.html या वर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रत्नागिरीकरांसाठी ऑफलाईन नोंदणी
तांत्रिक कारणांमुळे ऑनलाईन रजिस्टर करता येत नाहीये, त्यांच्यासाठी ऑफलाईन रजिस्ट्रेशन रत्नागिरी शहरात खालील ठिकाणी उपलब्ध आहे. जोशी फूड्स (हॉटेल मिथिला शेजारी), हॉटेल फ्लेवर्स (के. सी. जैननगर), उत्कर्ष स्टेशनरी (हॉटेल कार्निवल शेजारी), हॉटेल कार्निवल इन, आनंदकल्प हॉस्पिटल (शांतीनगर). या ठिकाणी जाऊन ऑफलाईन फॉर्म भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.