रत्नागिरी : जयगड येथील वायू गळती प्रकरण आता चिघळताना दिसत आहे. वायू गळतीने विद्या मंदिर, जयगड मधील 68 विद्यार्थांना श्र्वसनाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे अद्यापही दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. आता या प्रकरणात ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी कंपनी व्यवस्थापन आणि जयगड पोलीस ठाण्यावर 18 रोजी धडक मोर्चा काढला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जयगड पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, जयगड यांनी या संदर्भात एक बैठक घेऊन कंपनी व्यवस्थापनाला एक निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी मुलांच्या आरोग्यविषयक सुविधांची मागणी केली आहे.
मागण्या पुढील प्रमाणे
१) जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांकडून मेडिकल रिपोर्ट मागणी करणे.
२) शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांचा कायम स्वरुपी मेडिक्लेम करणे.
३) भविष्यात उद्भवणा-या सर्व आजारांची जबाबदारी कंपनीने घेणे.
४) शाळेच्या आवारात सुसज्य रुग्णवाहिका व त्याच बरोबर तज्ञ डॉक्टर कायम स्वरुपी उपलब्ध ठेवणे.
५) विद्याथी, शिक्षक व कर्मचा-यांची आरोग्य तपासणी वेळच्यावेळी करावी.
६) कंपनीने गॅस वाहतूक व गॅस साठवणूक त्वरीत बंद करावी.
७) कंपनीकडून १०० बेडचे सुसज्य हॉस्पीटल तयार करणे.
८) उर्जा हॉस्पीटलमध्ये तिनही शिपट मध्ये तज्ञ डॉक्टर उपस्थित असावेत.
९) डॉक्टर कुंभार यांना उर्जा हॉस्पीटलमधून काढून टाकणे.
१०) उर्जा हॉस्पीटलमध्ये तज्ञ नर्सेस नियुक्त करणे.
११) डॉक्टरांच्या नावाची व वैद्यकिय पदवीची पाटी। लिहीलेली असावी.
१२) यापुढे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उदभवणा-या आजारांसाठी सरकारी हॉस्पीटल मध्ये दाखल न करता खाजगी मध्ये दाखल केल्यावर त्याचे वैद्याकिय बिल मिळावे.
१३) दिनांक १२/१२/२०२४ रोजीच्या वायु गळती घटनेशी संबंधीत बाधीत विद्यार्थ्यांना हॉस्पीटलचा व पालकांचा वैयक्तिक खर्च कंपनीकडून मिळावा.
१४) बाधित विद्यार्थ्यांचे काही पालक, जे.एस.डब्ल्यू. कंपनीमध्ये कर्मचारी असल्यामुळे, ते मुलांसोबत असल्यामुळे गैरहजर दिवसांचाही पगार मिळावा.
१५) बाधित विद्यार्थ्यांचे पालक जे इतरत्र काम करत आहेत. त्यांनाही आर्थिक मोबदला मिळावा.
१६) विद्याथ्यर्थ्यांचे आरोग्य सुदृढ रहाण्यासाठी सकस आहाराची व्यवस्था करण्यात यावी.