खेड : दिवाळी सुटीच्या हंगामासह विधानसभा निवडणूक, सहली व प्रासंगिक करारातून व येथील आगाराला २ कोटी ५० लाख ७७ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दिली.
दिवाळी सुटी हंगामात बसफेऱ्यांना होणारी गर्दी लक्षात घेता जादा बसफेऱ्या सोडण्यात आल्या. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतही आगाराला उत्पन्न प्राप्त झाले. सहलीचा हंगाम सुरू झाल्याने हंगामात शाळा, महाविद्यालयांकडून बसफेऱ्यांची मागणी वाढली आहे. यातूनही आगाराच्या उत्पन्नात भर पडत आहे. विशेषतः नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सुटीच्या लांब पल्ल्याच्या मार्गावर विशेष बसफेऱ्या चालवण्यात आल्या. त्यातून कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला ६३ बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यातूनही आगारास उत्पन्न मिळाले.