रत्नागिरी : शहरातील बेलबाग येथील तरुणाला उलटीतून रक्त पडले. त्यामुळे त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. आशिष अशोक मजगावकर (वय ४१, रा. बेलबाग, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १६) पावणेतीनच्या सुमारास खासगी रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत मजगावकर यांना मद्य प्राशनाचे व्यसन होते. ते घरी असताना अचानक त्यांना उलटी झाली. तत्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.