सचिन मोहिते : देवरुख
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था आयोजित १५ व्या तालुकास्तरीय दादासाहेब सरफरे आंतरशालेय कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन दि.२० व २१ रोजी करण्यात आले आहे.
हा महोत्सव दादासाहेब सरफरे विद्यालय शिवने येथे घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या कला क्रीडा गुणांना वाव देण्याकरिता या महोत्सवाचे आयोजन गेली अनेक वर्ष करण्यात येत आहे. या महोत्सवाला माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. यामध्ये कबड्डी खो-खो, मैदानी खेळ, चित्रकला या स्पर्धांचा समावेश आहे. महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २० रोजी सकाळी ९ वाजता माजी राज्यमंत्री रवींद्र माने व वाशिष्टी दुग्ध प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष सदानंद भागवत, देवरुखच्या तहसीलदार अमृता साबळे, देवरुख पंसचे गटविकास अधिकारी भरत चौगले, उद्योजक संजय भाताडे, गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, तसेच शिवणे सरपंच मारुती पवार, कोसुंब सरपंच पूजा बोथरे, लोवले सरपंच ऋतुजा कदम, करंबेळे सरपंच मानसी बारगुडे, तेर्ये सरपंच दुर्वा भुरवणे, मुचरी सरपंच सुवर्णा जाधव उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहे. २० रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या बक्षीस वितरणाला प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्याध्यक्ष नेहा माने, संगमेश्वर पोलीस निरीक्षक अमित यादव, बुरंबी प्रा.आ. केंद्राचे डॉ. व्हीआर रायभोळे उपस्थित राहणार आहेत. तर २१ रोजीचा बक्षीस वितरण समारंभ सायं ४ वाजता कार्यासन अधिकारी वित्त विभाग मंत्रालय मुंबई वैदही चेतन सावंत, देवरुख पोलीस निरीक्षक अतुल जाधव, राजेंद्र पोरे यांच्या हस्ते होणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम रविवारी रात्री २२ रोजी घेण्यात येणार आहे. ज्यावेळी गुणगौरव सोहळ्याला रात्री ९ वा. आमदार शेखर निकम उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्रीपत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण, बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर, गोवा रीजनचे आनंद डिंगणकर उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार किरण सावंत यांची देखील उपस्थिती लाभणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष राजाराम गर्दे हे भुषविणार आहेत. या महोत्सव करिता संस्थेचे पदाधिकारी मेहनत घेत आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था प्रशासनाकडून करण्यात येत आहे.