लांजा : नारळ काढण्यासाठी माडावर चढलेला नेपाळी कामगार खाली कोसळून गंभीर जखमी झाल्याची घटना लांजा साटवली भंडारवाडी येथे घडली. या जखमी नेपाळी गुरख्याला तातडीने कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर तालुक्यातील दसुर येथील काझी नामक व्यक्तीकडे सदर गोविंद थापा नावाचा नेपाळी गुरखा त्यांच्या बागेत कामाला आहे. लांजा तालुक्यातील साटवली येथे दररोज दूध घालण्यासाठी साटवली येथील डेअरीवर येत असतो. दरम्यान, सोमवार१६ डिसेंबर रोजी तो सकाळी नेहमीप्रमाणे साटवली येथे दूध घालण्यासाठी आला होता. यावेळी येथील एका व्यक्तीने त्याला आपल्या नारळाच्या झाडावर नारळ काढण्यासाठी चढवले होते.
मात्र नारळाचा उंच झाडावरून खाली पडल्याने या घटनेत गोविंद थापा हा नेपाळी गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने लांजा व त्यानंतर रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.