रत्नागिरी : शहरातील चंपक मैदान येथे डंपरच्या मागील चाकाखाली सापडून 22 वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना बुधवार 18 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. जाकिर मौलवी रीपाई (22, क्रांतीनगर, झोपडपट्टी ) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की जाकीर हा आपल्या ताब्यातील दुचाकीवरून मिऱ्या नागपूर रस्त्याने चालला होता. सकाळी 7 वाजता परटवणेच्या दिशेने जात असताना गाडी घसरून टँकरच्या मागच्या चाकाखाली सापडला. यामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लगल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. याबाबतचा अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.