खेड : खेड-दापोली मार्गावरील दस्तुरीनजीक एका पिंपळाच्या झाडाखाली मोकळया जागेत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून 1 हजार रुपयांचा ऐवज जफ्त केला. उमेश पांडुरंग तांबे (40) यायावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो एका दैनिकात प्रसिद्ध होणारया शुभ अंकावर पैसे लावून मटका जुगारा खेळ खेळवित असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याबाबत पोलीस शिपाई रमेश बांगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.