खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत झालेल्या वायुगळतीने दोघे कामगार गंभीर झाल्याची माहिती मंगळवारी समोर आली आहे. या जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले समजते. दोन्ही कामगारांची प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी चिपळूण येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. यामागचा नेमका तपशील सायंकाळी उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकला नाही. या कंपनीत झालेल्या वायूगळतीने कंपनीतील कामगारांसह अन्य कंपनीतील कामगारांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे.