संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबे जवळच्या परचुरी येथील पुलाखाली अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला असल्याने खळबळ उडालेली आहे. सदरचा मृतदेह काढण्याची काम संगमेश्वर पोलिसांनी हाती घेतले असून मृतदेह ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदरचा मृतदेह मंगळवारी संध्याकाळी आढळून आला आहे.