सिंधुदुर्गातील संशयितावर गुन्हा
रत्नागिरी : तालुक्यातील गोळप कातळवाडी येथे कर्ज देण्याचे आमिष दाखवून महिलांना 2 लाख 30 हजार 499 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आह़े. ही घटना 4 ते 11 नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीत घडल़ी. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलांनी पूर्णगड पोलिसांत तक्रार दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा.
ओमकार पालव (ऱा कुडाळ सिंधुदुर्ग) असे संशयिताचे नाव आह़े. 24 ऑक्टोबर 2024 रोजी एका फायनान्सियल कंपनीची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होत़ी. ही बातमी वाचून तक्रारदार यांनी संबंधित कंपनीचा विभाग प्रमुख ओमकार पालव याला संपर्क केल़ा. यावेळी पालव याने तुम्ही 10 ते 12 महिलांचा गट तयार करा तुम्हाला कर्ज देण्याची व्यवस्था करतो अशी बतावणी केल़ी. त्यानुसार महिलांनी गट तयार केला असता कर्ज प्रक्रिया, सभासद नोंदणी, भाग भांडवल फी, नोटरी स्टँप आदींसाठी पैशाची मागणी केल़ी.
आपल्याला कर्ज मिळणार असल्याने पालव याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलांनी रोख व गुगल पे द्वारे पालव याला एकूण 2 लाख 30 हजार 499 रुपये दिल़े. पालव याने पैसे घेतले असताना देखील महिलांना कोणतेही कर्ज उपलब्ध करुन दिले नाह़ी. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे या महिलांच्या लक्षात आल़े. त्यानुसार त्यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात पालव याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल़ी. पोलिसांनी याप्रकरणी पालव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 318 (4),316(2) नुसार गुन्हा दाखल केल़ा.