4 महिन्यापूर्वी घडली होती घटना
रत्नागिरी : तालुक्यातील तोणदे येथे विषारी द्रव्य प्राशन केल्याने दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी समोर आला होत़ा. याप्रकरणी पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आह़े. दारु पिण्यासाठी वापरण्यात आलेल्या बाटलीत किटकनाशक फवारणीची औषध असल्याने या तरुणांना विषबाधा होवून त्यांचा मृत्यू झाल़ा अशी बाब पोलीस तपासात उघड झाली आह़े. पोलिसांनी याप्रकरणी किटकनाशकासाठी वापरलेली बाटली दारु पिण्यासाठी देणाऱ्या तरुणावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल़ा. सुदर्शन प्रकाश शिरधनकर (33) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 20 ऑगस्ट 2024 रोजी सुदर्शन शिरधनकर हा विघ्नेश देवेंद्र भाटकर (24) व समाधान प्रकाश पाटील (46) हे तोणदे येथील मोबाईल टॉवरच्या खाली दारु पिण्यासाठी बसले होत़े. यावेळी संशयित आरोपी सुदर्शन याने किटकनाशकासाठी वापरण्यात आलेल्या बाटलीमध्ये दारु मिक्स केल़ी तसेच ही दारु विघ्नेश व समाधान पाटील यांना पिण्यासाठी दिल़ी तसेच स्वत: देखील सुदर्शन याने दारु प्राशन केली.
दारु प्राशन केल्यानंतर तिघेही आपआपल्या घरी निघून गेल़े. दुसऱ्या दिवशी सकाळी तिघांनाही अस्वस्थ वाटून उलटल्यांचा त्रास होवू लागल़ा. यावेळी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल़े. उपचारादरम्यान विघ्नेश भाटकर व समाधान पाटील यांचा मृत्यू झाल़ा. एकाच वेळी तिघांना विषबाधा झाल्याने पालिसांकडून या घटनेचा सखोल तपास करण्यात येत होत़ा. तसेच मृतांचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठविला होत़ा.
पोलिसांच्या तपासामध्ये संशयित आरोपी याने किटकनाशकासाठी वापरलेली बाटली दारु पिण्यासाठी वापरल्याचा प्रकार समोर आला होत़ा. व्हिसेना अहवालात देखील विषबाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 106 (1) नुसार गुन्हा दाखल केल़ा. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.