खेड : तालुक्यातील खारी-वाळंजवाडी येथील 11 वर्षीय मुलाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आर्यन सुभाष मोहिते असे मृत मुलाचे नाव आहे.
आर्यनला वारंवार फिट येत होत्या. तो घराशेजारी अंगणात खेळत असताना अचानक फिट येवून खाली पडला. यानंतर सर्वप्रथम कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्याला मृत घोषित केले.