तुषार पाचलकर / राजापूर:-राजापूर तालुक्यातील रायपाटण गावचा सुपुत्र हरीओम महादेव शिंदे (वय 23) याची भारताच्या निमलष्करी दलात (पॅरामिलिटरी फोर्स) चीन सीमेवर नियुक्ती झाली असून रायपाटण परिसरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
मागील काही वर्षे हरीओमने आपले ध्येय गाठण्यासाठी अपार मेहनत घेतली होती. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि भारताच्या निमलष्करी दलात (पॅरामिलिटरी फोर्स) भरती झाला आहे. सद्या हरीओम याची चीन सीमेवर निवड झाली आहे. रायपाटणच्या या सुपुत्राची निवड होताच रायपाटण परिसरामधून हरिओमचे अभिनंदन करण्यात येत आहे.