लांजा : आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या विकास कामाच्या पद्धतीवर प्रेरित होऊन लांजा तालुक्यातील पडवण येथील शिवसेना ठाकरे गटाच्या तालुका पदाधिकाऱ्यांसह गावतील दोनशे नागरिकांनी शिवसेनेमध्ये शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्याने पडवण गावामध्ये ठाकरे गटाला मोठी खिंडार पडली आहे. त्यामुळे पडवण गावात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे.
युवा सेना व उबाठा सेनेचे पदाधिकारी असलेल्या दोन शाखा प्रमुख, तीन युवासेना पदाधिकारी, दोन ग्रामपंचायत सदस्या व एक गाव प्रमुख अशा मुख्य पदाधिकारी असलेल्या उबाटा सेनेच्या शिलेदारांनी साथ सोडल्याने पडवण गावात उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. याचे पडसाद तालुका कार्यकारनीवर उमटले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी विकास कामांबाबत नाराजी व्यक्त करून व आमदार किरण सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून लांजा व राजापूर तालुक्यातील शिवसेना उबाठाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा एकप्रकारे धडकाच सुरू झाला होता. मात्र विधानसभा निवडणूकांनंतरही पक्ष प्रवेशाचे वारे सुरू असून लांजा तालुक्यातील पडवण येथील उबठा शिवसेनेचे पदाधिकारी असलेले युवासेना विभाग अधिकरी सुरज कुडतडकर, शाखाप्रमुख विजय कुळये, उपशाखा प्रमुख दयानंद रांबाडे, युवा सेना शाखा अधिकारी कृष्णा रांबाडे, गाव प्रमुख यशवंत जाधव, विनोद बराम, यांनी आपल्या गावातील दोनशे नागरीकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने उबाठा सेनेला गावात हदरा बसला आहे. विकास कामांबाबत नाराजी असल्याने पडवण गावतील नागरिकांनी किरण सामंत यांच्या नेतृत्वाला स्वीकारले आहे. आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला.
या पक्षप्रवेश कार्यक्रम प्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील उर्फ राजू कुरूप, तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, एस.एन.कांबळे, प्रसाद माने, भांबेड उपसरपंच राजु गांधी, प्रमोद गांगण, विनय गांगण, उप तालुका प्रमुख सुजित आंबेकर, तालुका उपसंघटक चेतन खंदारे, सुहास खामकर सौ.मानसी आंबेकर, सौ.अनुष्का कातकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी आमदार किरण सामंत यांनी सर्व नागरिकांचे पुष्फगुच्छ देऊन शिवसेना शिंदे गटात स्वागत केले. पडवण गावच्या विकासासाठी कटिबद्ध असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार. कोणीही कितीही जोर लाऊद्या आपण विकासाच्या माध्यमातून विरोधकांचा मनसुबा उधळून लावूया. त्यासाठी तुम्हा सर्व नागरिकांची साथ-सोबाय लागणार आहे. नागरिकांनी दिलेला विश्वस हाच माझ्यासाठी माझ्या कामाची पोचपावती आहे असे प्रतिपादन किरण सामंत यांनी पडवण येथे केले. पक्षप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी पडवण गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते.