रत्नागिरी : शहरानजीकच्या खेडशी येथील माहेर संस्थेतील वृध्दाचा शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात आकस्मिक मृत्यू झाला. जितेंद्र पांडुरंग सनगरे (६०) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. त्यांना सांभाळण्यासाठी कोणीही नसल्याने ते ३१ ऑक्टोबर २०२४ पासून निराधार म्हणून माहेर संस्थेत रहायला आले होते. काळजी वाहकाने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला परंतु, ते उठले नाहीत. म्हणून त्याने त्यांना संस्थेच्या गाडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सकाळी १०.३० वा. सुमारास तेथील डॉक्टरांनी जितेंद्र सनगरे यांना मृत घोषित केले.