पावस : तालुक्यातील चांदोर- उगवतीवाडी येथील प्रौढाच्या पोटात दुखू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जनार्दन बारक्या करसोडे (वय ५२, रा. चांदोर उगवतीवाडी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १३) रात्री अकराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता. १२) दुपारी तीन वाजता पोटात दुखू लागल्याने तत्काळ त्यांना उपचारासाठी चांदेराई येथील शासकीय दवाखान्यात नेले.