रत्नागिरी : पाचल (ता. राजापूर) येथील बाजारपेठेत वाहतुकीस अडथळा होईल, असे वाहन पार्क ‘करणाऱ्या चालकाविरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर शिवराम सुर्वे (२८, रा. मुर- पाटीलवाडी, ता. राजापूर) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १४) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित चालक सुर्वे यांनी मोटार (एमएच-१४- सीसी-३३३१) पाचल बाजारपेठ येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशी उभी केली होती.