रायगड : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात कळंबोली वसाहतीच्या परिसरामध्ये अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अधिक चौकशी केली असता यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय नवी मुंबई अमली विरोधी पथकाला होता. पोलिसांनी अमली पदार्थाचा पुरवठा करणारे पंजाबी ट्रक ड्रायव्हर ,त्यांचे हस्तक तसेच अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या अन्य आरोपींच्या शोध सुरू केला आहे.
नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने कळंबोली सेक्टर 17 मधील फिनिक्स हाइट्स या इमारतीजवळ सापळा लावला होता यावेळी अनिल पांडे (२०) हा तरुण अमली पदार्थाची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळ हेरॉईन आणि वेल सिरेक्स कप सिरपच्या बाटल्या आढळून आल्या त्याने फिनिक्स हाइट्स बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या गुरुजीत रंधवा उर्फ सनी (३१) याने आपल्याला अमली पदार्थ विक्री करण्यासाठी त्यानुसार प्रत्येकाने बंद व्हा याच्या घरी छापा मारला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन घराच्या झेडपीमध्ये हिरोईन आणि रोख रक्कम आढळून आली पोलिसांनी अनिल पांडे आणि गुरुजीत रंधवा या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून हेरॉईन आणि 17 कप सिरपच्या बाटल्या चार लाखाची रोख रक्कम अशा एकूण सहा लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पनवेल कळंबोली नवी मुंबई परिसरात गेल्या काही महिन्यापासून अमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचा संशय पोलिसांना आला होता यामध्ये फार मोठे रॉकेट सहभागी असावे असा देखील पोलिसांना संशय होता वरील दोन आरोपींविरुद्ध कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांची पोलीस कोठडीमध्ये रवाना करण्यात आली आहे. यातील दोन आरोपी ट्रक ड्रायव्हर असून त्यांनी मोहसीन जहरीवाला या हस्त का मार्फत अमली पदार्थ पुरविले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. साहिल अमरजीत सिंग ,विकी रंधवा हे विक्री करत होते तर कळंबोलीत राहणारे सनी विलखु ,विकू सिंग, करण चव्हाण, रूपसिंग हे हिरोईन आणि कोडीन बाटल्यांचा पुरवठा करून त्यांची विक्री करत असल्याचे तपासात आढळले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.