मंडणगड : पंधराव्या विधानसभेच्या निवडणुकीत दापोली मतदार संघातून निवडून गेलेले आमदार योगेश कदम यांनी 15 डीसेंबर 2024 रोजी नागपूर येथे राज्य मंत्रीमंडळाचे विस्तारात राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दापोली विधानसभा मतदार संघास 49 वर्षानंतर राज्यमंत्रीपदाचा मान मिळाला असल्याने दापोलीसह पुर्ण मतदारसंघात उत्साह व आनंदाचे वातावरण आहे.
यापुर्वी आमदार बाबूराव बेलोसे यांनी 1975 साली मंत्रीपदाची शपथ घेतली होती त्यानंतर 49 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मतदरासंघाचा मंत्रीपदाचा दुष्काळ आमदार योगेश कदम यांच्या रुपाने संपुष्टात आला आहे. दरम्यान आमदार योगेश कदम यांना या खेपेस मंत्रीपद मिळणार असल्याची खुणखूण गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात होतीच त्यामुळे आज आमदार योगेश कदम यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच मंडणगड तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह महायुतीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरातील मुख्य चौकात येऊन फटाक्यांची आतीषबाजी करीत घोषणादेत जयघोष केला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, चेतन सातोपे, अनंत लाखण, विनोद जाधव, योगेश जाधव, अस्मिता केंद्रे, दोस्तमहमंद चौगुले, सेजल गोवळे, प्रविण जाधव, राजा लेंढे, निलेश गोवेळ, संदीप कदम, इरफान बुरोंडकर, संतोष पार्टे, प्रमिला किंजळे, वैशाली रेगे, निलेश सापटे, गणेश काटकर, अझहर मुकदाम, राजेंद्र आंबेकर, नागेश घोसाळकर, गजानन तांबुटकर, संजय शेडगे, मनोज शिंदे, निलेश रक्ते, संजय राणे, आजीम कडवेकर, विनीत रेगे, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.