रायगड : मुंबई -गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील महाड हद्दीतील टेंभुर्लीनजीक रविवारी सकाळच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात यशवंत हरिश्चंद्र म्हाप्रलकर (65) यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. अपघातात टेम्पोतील तिघांसह दुचाकीस्वारही गंभीररित्या जखमी झाला आहे.
सुरज सावंत हा आपल्या ताब्यातील दुचाकीने महाडच्या दिशेने जात असताना टायर पंक्चर झालेल्या टेम्पोवर जावून आढळला. या अपघातात टेम्पोतील बाहेर उभे असणारे चौघेजण जखमी झाले. यातील 65 वर्षीय वृद्धास गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी महाड रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. अपघाताचे वृत्त कळतात महाड पोलीस घटनास्थळी पोहचून टेम्पोतील जखमींना मदतकार्य केले. अपघातप्रकरणी दुचाकीस्वार सुरज सावंत याच्यावर महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.