रत्नागिरी : रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी नागपूर मध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर रत्नागिरीमध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. रत्नागिरी शहरातील जयस्तंभ या ठिकाणी सामंत यांचे कार्यालय आहे. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकत्रित येत फटाके फोडले. तसंच किररण सामंत आणि उदय सामंत यांच्या नावाच्या जयघोषाच्या घोषणा देखील दिक्या. उदय सामंत पुन्हा एकदा मंत्री झाल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे.