16 किलो वजनी गटात राज्य स्तरावर खेळणारा सर्वात लहान खेळाडू
रत्नागिरी : पंचकुला हरियाणा येथे नुकत्याच पार पडलेल्या तायक्वाँदो स्पर्धेत रत्नागिरीच्या सार्थक गमरेने आपली कामगिरी यशस्वीपणे सार्थकी लावली. त्याने तायक्वाँदो स्पर्धेत 16 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावल़े तसेच पुमसे या प्रकारात त्याने रौप्य पदक पटकावल़े. स्पर्धेतील सार्थक याच्या कामगिरीची दखल घेत भावेश याची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आह़े. सार्थक याच्या या कामगिरीबाबत सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आह़े.
हरियाणाच्या पंचकुला स्टेडियम येथे 38 वी नॅशनल सब ज्युनिअर क्यूरोगी व 13 व नॅशनल सब ज्युनिअर पुमसे तायक्वाँदो चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत़े. 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत या स्पर्धा पार पडल्य़ा. सार्थक याने 16 किलो वजनी गटात क्युरोगी चुरशीची लढत दिल़ी. रत्नागिरी जिल्ह्यातील लहान गटातील नॅशनल स्थरावर खेळणारा तो एकमेव खेळाडू होत़ा. हरियाणातील नॅशनल स्पर्धेवेळी तेथील मंत्र्यांना मानवंदना देताना सार्थक याने महाराष्ट्राचे नेतृत्व केले. वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने जिद्दीने व मेहनतीने ब्लॅक बेल्टला गवसणी घातल़ी. यापूर्वी त्याला बेस्ट फायटर म्हणून गौरविण्यात आले आह़े. सार्थक याच्या यशात तायक्वाँदो मार्शल आर्ट क्लबचे प्रमुख मार्गदर्शक राम कररा, ऍड़ लोखंडे, मुख्याध्यापिका सायली राजवाडे, वर्गशिक्षक प्रवीण मोरे यांचे मार्गदर्शन लाभल़े.