दापोली : तालुक्यातील बुरोंडीलगत असणाऱ्या तेलेश्वर नगर येथे वणवा लागून शांताराम रांगले यांच्या बागेतील 23 आंब्यांसह 25 काजूच्या झाडांचे मोठे नुकसान झाले.
दापोली तालुक्यातील बुरोंडी-तेलेश्वर नगर येथील शांताराम रांगले यांची काजू व आंब्याची बाग आहे. या बागेला शनिवारी वणवा लागला. या वणव्यात शांताराम रांगले यांच्या आंबा व काजूच्या झाडांचे प्रचंड नुकसान झाले. सध्या थंडीचा हंगाम सुरू आहे. यामुळे काजूच्या झाडांना चांगला मोहोर आला आहे. आंब्याच्या झाडांना देखील पालवी फुटली आहे. त्यामुळे या वणव्यामुळे रांगले यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.